माहिकाची चर्चा सुरू असतानाच हार्दिक पांड्याच्या Ex ने शेअर केले बिकिनीतील फोटो, सोशल मीडियावर धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:37 IST2026-03-10T15:33:52+5:302026-03-10T15:37:27+5:30
सगळीकडे माहिका शर्माची चर्चा सुरू असतानाच हार्दिक पांड्याच्या एक्सने सोशल मीडियावर बिकिनीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर क्रिकेटर हार्दिक पांड्या चर्चेत आला. हार्दिकचे त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबतचे फोटो आणि स्टेडियममधील व्हिडीओ व्हायरल झाले होते.

सगळीकडे माहिका शर्माची चर्चा सुरू असतानाच हार्दिक पांड्याच्या एक्सने सोशल मीडियावर बिकिनीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

हार्दिकची एक्स पत्नी नताशा स्टँकोविचने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये बीचवरील बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत.

नताशा सध्या मुलगा अगस्त्यसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. नताशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नताशा अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

नताशा आणि हार्दिकने लॉकडाऊनमध्ये लग्न केलं होतं. त्याआधी काही वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते.

लग्नानंतर एका वर्षातच नताशा आणि हार्दिक यांना अगस्त्य हे पुत्ररत्न झालं होतं. पण लग्नानंतर ४ वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर हार्दिक आता माहिका शर्माला डेट करत आहे. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये माहिका हार्दिकला चिअर करताना दिसली होती.

















