गोविंदा, तब्बू, काजोलसोबतच या बॉलिवूड सेलिब्रिटींनी कधीच वापरलं नाही त्यांचं आडनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 12:31 IST2022-03-30T12:13:01+5:302022-03-30T12:31:20+5:30

Bollywood celebs surname : काहींची नावं मोठी असतात ते लहान करण्यासाठी तसं करतात तर काही लोक वेगळ्या कारणाने तसं करतात. अशाच काही सेलिब्रिटींची नावं तुम्हाला सांगतो.

Bollywood celebs surname : मेहनतीने मिळालेलं यश आणि स्टेटससाठी काही बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या नावात किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करतात. पण काही असेही कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये फक्त त्यांचं नाव वापरलं आडनाव नाही. हा तर प्रत्येका वयक्तिक प्रश्न आहे. आडनाव न वापरण्यासाठी वेगवेगळी कारणं असतात. काहींची नावं मोठी असतात ते लहान करण्यासाठी तसं करतात तर काही लोक वेगळ्या कारणाने तसं करतात. अशाच काही सेलिब्रिटींची नावं तुम्हाला सांगतो.

काजोल - बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली काजोलचं पूर्ण नाव काजोल मुखर्जी आहे. लग्नानंतर ती काजोला अजय देवगण झाली. पण दोन्हीही आडनावं लावत नाही. असं म्हणतात की, आई-वडील वेगळे झाल्यापासून ती आडनाव वापरत नाही. काजोलच्या आईचं नाव तनुजा आहे आणि तिच्या वडिलांचं नाव शोमू मुखर्जी होतं. त्यांचं १० एप्रिल २००८ ला निधन झालं.

तब्बू - तब्बूचं पूर्ण नाव तबस्सुम हाश्मी आहे. सिनेमात काम सुरू केलं तेव्हा तिने यातील केवळ तब्बू हे नाव ठेवलं. तब्बू ही अभिनेत्री फराहची लहान बहीण आहे. तसेच शबाना आझमी, तन्वी आझमी आणि बाबा आझमीची भाची आहे.

हेलन - अभिनेत्री हेलन यांचं पूर्ण नाव हेलन एन रिचर्डसन आहे. सिनेमात एन्ट्री घेताना त्यांनी हेलन हेच नाव ठेवलं. हेलन यांनी अभिनेता-लेखक सलीम खान यांच्याशी लग्न केलं.

वैजंयतीमाल - वैजयंतीमाला आपल्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांचं पूर्ण नाव वैजयंतीमाला रमन असं होतं. हे नाव मोठं होत असल्याने त्यांनी फक्त वैजयंतीमाला हेच वापरलं.

रेखा - रेखा यांचं पूर्ण नाव भानूरेखा गणेशन आहे. सिनेमासाठी त्यांनी त्याचं नाव रेखा केलं. तसेच रेखाचं वडिलांचं नातं चांगलं नव्हतं. त्यामुळेही त्यांनी त्यांचं नाव कधी वापरलं नाही.

फराह - फराहचं पूर्ण नाव फराह नाज हाश्मी आहे. बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली तेव्हा तिने नाव लहान केलं. फराह ही अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहे.

धर्मेंद्र - धर्मेंद्र यांचं पूर्ण नाव धरम सिंह देओल आहे. पण सिनेमात आल्यावर त्यांनी त्यांचं नाव धर्मेंद्र असं केलं. धर्मेंद्र हे आपल्या काळातील एक सुपरस्टार आहेत. त्यांना लोकांचं खूप प्रेम मिळालं.

मेहमूद - प्रसिद्ध कॉमेडिअन मेहमूद यांचं पूर्ण नाव मेहमूद अली असं आहे. पण सिनेमासाठी त्यांनी केवळ मेहमूद हे नाव वापरलं. मेहमूद हे प्रसिद्ध गायक लकी अलीचे वडील आहेत.

रंजीत - ८० आणि ९० च्या काळातील प्रसिद्ध व्हिलन रंजीत यांचं पूर्ण नाव रंजीत बेदी आहे. सिनेमात त्यांनी केवळ रंजीत वापरलं.

तनुजा - अभिनेत्री तनुजा यांच पूर्ण नाव तनुजा समर्थ आहे. पण सिनेमासाठी त्यांनी केवळ तनुजा वापरलं. नंतर त्यांनी शोमू मुखर्जीसोबत लग्न केलं. त्यांच्या दोन मुली म्हणजे काजोल आणि तनीशा. दोघींपैकी केवळ तनीशा तिचं आडनाव वापरते.

असीन - साऊथमधील अभिनेत्री असीनचं आडनाव थोडं मोठं आणि वाचायला किचकट आहे. त्यामुळेच तिने आडनाव कधी लावलं नाही. तिचं पूर्ण नाव Asin Thottumkal असं आहे.

गोविंदा - बॉलिवूडचा हिरो नंबर १ गोविंदाचं पूर्ण नाव गोविंदा अरूण आहुजा आहे. पण सिनेमात एन्ट्री घेण्यासाठी त्याने नाव लहान करून गोविंदा इतकंच ठेवलं.

शान - गायक शानचं पूर्ण नाव शांतनु मुखर्जी असं आहे. त्याचं त्याने शान असं केलं. शांतनु मुखर्जी हे नाव फार मोठं वाटतं.

श्रीदेवी - दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं पूर्ण नाव श्री अम्मा यंगर अय्यपन असं होतं. अर्थातच हे नाव फार अवघड वाटलं असतं. म्हणून त्यांनी त्यांचं नाव श्रीदेवी असं ठेवलं. हेच नाव त्यांनी नेहमी वापरलं. नंतर त्यांनी बोनी कपूरससोबत लग्न केलं.