Esha Deol : प्रदीर्घकाळानंतर ईशा देओल करणार रुपेरी पडद्यावर कमबॅक, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 07:24 PM2023-01-16T19:24:59+5:302023-01-16T19:29:50+5:30

अभिनेत्री ईशा देओल 'मैं' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या चित्रपटात अमित साध देखील दिसणार आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन सराफ यांच्या 'मैं' या चित्रपटात साध 'एनकाउंटर स्पेशालिस्ट'ची भूमिका साकारणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अजय देवगणच्या रुद्र: द एज ऑफ डार्कनेससह ओटीटी प्लॅटफॉर्मवर एंट्री करणाऱ्या ईशाने तिच्या चित्रपटाबद्दलची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली. (फोटो: इंस्टाग्राम)

ईशा म्हणाली, “चित्रपटातील माझी भूमिका स्त्रिच्या यशाची गोष्ट सांगते. हा एक अतिशय सोपा पण अतिशय मजबूत संदेश देते. माझी व्यक्तिरेखा ही एका स्त्रीची कथा आहे जिने स्वत:ला उत्तमरित्या घडवलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)