इमरान हाश्मीसोबत डेब्यू अन् KL राहुलसोबत अफेअर...वयाच्या ३५ व्या वर्षीही सोनलचा इंटरनेटवर जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 04:49 PM2023-01-17T16:49:42+5:302023-01-17T17:03:10+5:30

अभिनेता इमरान हाश्मीच्या 'जन्नत' या चित्रपटातून रातोरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनल चौहान सोशल मीडियावर आजही तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.

२००८ मध्ये रिलीज झालेला इमरान हाश्मीचा 'जन्नत' चित्रपट लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटात इमरानसोबत अभिनेत्री सोनल चौहान दिसली होती. जन्नत सिनेमा हिट ठरल्यानंतर सोनल चौहाननंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनल चौहानने चित्रपटात झोया नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती आणि इमरान हाश्मीसोबत तिची ऑन-स्क्रीन जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडली होती. यासोबतच अभिनेत्रीच्या सौंदर्यानंही अनेक जण घायाळ झाले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

'जन्नत' रिलीज होऊन १४ वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी सोनल चौहान आजही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. इन्स्टाग्रामवरील तिचे फोटोच याची ग्वाही देतात.

सोनल चौहान अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा फोटो शेअर करत असते. सोनलला इंस्टाग्रामवर ५२ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)

आज सोनल चौहान ३५ वर्षांची आहे आणि वाढत्या वयानुसार ती अधिक ग्लॅमरस होत आहे. ही छायाचित्रे पाहून तिच्या ग्लॅमर आणि बोल्डनेसचा अंदाज येतो. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनल चौहानने बॉलिवूडशिवाय अनेक साऊथ चित्रपटांमध्येही काम केले. २००८ मध्ये तिने 'रॅम्बो' चित्रपटाद्वारे साऊथ सिनेसृष्टीत पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)

एकेकाळी सोनल चौहानचे वैयक्तिक आयुष्यही प्रसिद्धीच्या झोतात आले होते. तिचे नाव भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलसोबतही जोडलं गेलं होतं

केएल राहुल आणि सोनल दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण सोनलनं यात काहीच तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनल चौहानचे लाखो चाहते असून तिच्या ग्लॅमरस अदा आणि बोल्डनेसमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते.

सोनल चौहान सध्या बॉलीवूडच्या लाइमलाइटपासून दूर असली तरी सोशल मीडियात मात्र ती चांगलीच सक्रिय आहे.

सोनलचे चाहते तिच्या फोटोंवर आवर्जुन कमेंट्स करत असतात आणि तिचं कौतुकही करत असतात.