लंडन, मुंबईमध्ये आलीशान घरं! १० वी पास दिलजीत दोसांज आहे कोट्याधीश; संपत्ती पाहून विस्फारतील डोळे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 02:16 PM2022-01-06T14:16:58+5:302022-01-06T14:22:31+5:30

Diljit dosanjh: दिलजीतचं शिक्षण अगदी बेताचं असून त्याने केवळ १० वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. पंजाबमधील एका गावात त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं.

लोकप्रिय पंजाबी गायक, अभिनेता म्हणजे दिलजीत दोसांज(Diljit Dosanjh). आज या सुपरस्टारचा ३८ वा वाढदिवस.

केवळ पंजाबीच नव्हे तर हिंदी कलाविश्वातही त्याच्या नावाचा दबदबा निर्माण झाला आहे.

दिलजीतचा आज वाढदिवस असल्यामुळे सोशल मीडियावर त्याची तुफान चर्चा रंगली आहे. यात त्याच्या करिअरपासून पर्सनल लाइफपर्यंत अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत.

सर्वसामान्य कुटुंबातून येणारा दिलजीत आज कोट्यवधींचा मालक आहे. विशेष म्हणजे त्याने एकेकाळी किर्तन करुन आपलं घर सांभाळलं आहे. त्यामुळेच त्याच्या पर्सनल लाइफविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

दिलजीतचं शिक्षण अगदी बेताचं असून त्याने केवळ १० वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. पंजाबमधील एका गावात त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तो लुधियानाला गेला.

दिलजीतचे वडील पंजाब रोडवेजमध्ये काम करायचे. त्यावेळी त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे दिलजीत गुरुद्वारामध्ये किर्तन करायचा.

२००४ मध्ये दिलजीतचा 'इश्क दा उडा अड्डा' हा पहिला म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला. हा अल्बम त्यावेळी तुफान लोकप्रिय झाला.

त्यानंतर २००९ मध्ये दिलजीतला रॅपर हनीसिंग सोबत गाणं म्हणायची संधी मिळाली.

२०१६ मध्ये उडता पंजाब या चित्रपटाच्या माध्यमातून दिलजीतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटानंतर त्याने सूरमा, फिल्लोरी, गूड न्यूज या चित्रपटांमध्ये काम केलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिलजीत जवळपास २५ मिलिअन डॉलर संपत्तीचा मालक आहे. त्याच्याकडे फरारी, ऑडी, मर्सिडीज आणि वॉल्वो या चार लक्झरी कारदेखील आहेत.

पंजाबसह मुंबई आणि लंडन या दोन ठिकाणीही त्याचं घर आहे.