Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:37 IST2025-12-23T14:07:06+5:302025-12-23T15:37:48+5:30

तुम्हाला रणवीरचं पाकिस्तानी कनेक्शन माहितीये का? रणवीरचे पूर्वज पाकिस्तानात राहायचे.

'धुरंधर' या सिनेमामुळे रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या सिनेमात त्याने भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे.

पाकिस्तानी बनून कराचीमधील ल्यारी येथे हमझा अली बनून राहिलेल्या आणि गँगस्टर रहमान डकैत आणि त्याच्या दहशतवादी कारवायांची माहिती देशाला गुप्तपणे देणाऱ्या गुप्तहेराची भूमिका रणवीरने साकारली आहे.

रणवीरचं या भूमिकेसाठी सर्वत्रच खूप कौतुक होत आहे. पण, तुम्हाला रणवीरचं पाकिस्तानी कनेक्शन माहितीये का?

रणवीरचे पूर्वज पाकिस्तानात राहायचे. रणवीरचे आजोबा सुंदर सिंग भवनानी हे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कराची येथे वास्तव्यास होते.

मात्र १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तान सोडून भारतात यायचा निर्णय घेतला. पाकिस्तानातून भारतात आल्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले.

रणवीर सिंगचे आजोबा सुंदर सिंग भवनानी हे एक व्यावसायिक होते. तर त्यांच्या पत्नी चांद बर्क या तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.

त्यांना तोन्या ही मुलगी आणि जगजीत हा मुलगा अशी दोन मुलं आहेत. जगजीत सिंग भवनानी हे रणवीर सिंगचे वडील आहेत.

रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाचं कथानकही कराचीमधील ल्यारी येथेच घडत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या या पाकिस्तानी कनेक्शनची चर्चा होते आहे.

रणवीर सिंगचं खरं आडनाव हे भवनानी आहे. पण, इंडस्ट्रीत आल्यामुळे तो भवनानी हे आडनाव न लावता केवळ सिंग हे आडनाव वापरतो.