Dhurandhar: ४० वर्षांच्या रणवीरसोबत 'धुरंधर'मध्ये रोमान्स करणार २० वर्षांची सारा; कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:58 IST2025-11-18T15:54:39+5:302025-11-18T15:58:49+5:30

कोण आहे सारा अर्जुन? जिच्यासोबत रणवीर 'धुरंधर'मध्ये करणार रोमान्स, अभिनेत्यापेक्षा २० वर्षांनी लहान

ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. 'धुरंधर' सिनेमात रणवीरचा खुंखार लूक पाहायला मिळणार आहे.

या अॅक्शन पॅक सिनेमात रणवीर रोमान्सही करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ४० वर्षांचा रणवीर सिंग त्याच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार आहे.

'धुरंधर'च्या ट्रेलरमध्येही रणवीरच्या रोमान्सची झलक दिसते. रणवीरसोबत दिसणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव सारा अर्जुन असं आहे.

सारा अर्जुन ही २० वर्षांची आहे. २००५ मध्ये तिचा जन्म झाला. तिचे वडील राज अर्जुन हे प्रसिद्ध अभिनेते आहेत.

साराने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. तिने अनेक बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमध्येही काम केलं आहे.

साराने पोन्नियिन सेलवन या सिनेमात ऐश्वर्या रायच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

२० वर्षांची सारा अर्जून ही १० कोटींची मालकीण आहे. पण, सारा सोशल मीडियावर फार सक्रिय असल्याचं दिसत नाही.

'धुरंधर' सिनेमाच्या ट्रेलरमुळे सारा चर्चेत आली आहे. या सिनेमात ती रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.