हेमा मालिनीपेक्षा तब्बल 'इतक्या' वर्षांनी मोठे आहेत धर्मेंद्र, तरीही अभिनेत्रीने केलेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:57 IST2025-11-11T16:05:20+5:302025-11-11T16:57:20+5:30

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी. विवाहित असूनही धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीशी लग्न केलं.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धर्मेंद्र यांची प्रकृती आता स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचं निवेदन त्यांच्या टीमकडून देण्यात आलं आहे.

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीसाठी आणि ते लवकर बरे व्हावे यासाठी चाहते आणि कलाविश्वातील सेलिब्रिटी प्रार्थना करत आहेत.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी. विवाहित असूनही धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीशी लग्न केलं.

'तू हसीन मे जवान' सिनेमात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची भेट झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

१९८० साली धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं. तेव्हा धर्मेंद्र यांचं अगोदरच प्रकाश कौर यांच्याशी लग्न झालं होतं. आणि त्यांना मुलंही होती.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात वयाचं अंतरही खूप होतं. धर्मेंद्र हे हेमा मालिनीपेक्षा तब्बल १३ वर्षांनी मोठे आहेत.

तरीदेखील अभिनेत्रीने त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत.