दंगलच्या छोट्या बबिताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; ओळखताही येईना, फोटो पाहून व्हाल चकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 17:23 IST2023-11-29T16:55:08+5:302023-11-29T17:23:50+5:30
सुहानीने 2016 मध्ये दंगल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपटातील छोटी बबिता लोकांना प्रचंड आवडली.

बॉलिवूडमध्ये असे अनेक बालकलाकार आहेत जे त्यांच्या भूमिकांमुळे खूप चर्चेत आले आहेत. 'तारे जमीन पर'चा दर्शील सफारी असो किंवा 'दंगल' चित्रपटात बबिता फोगाटची बालपणीची व्यक्तिरेखा साकारणारी सुहानी भटनागर असो. त्यांनी अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली.
सुहानी भटनागरच्या क्यूटनेसने मोठ्या पडद्यावरही लोकांची मने जिंकली. पण आता ती मोठी झाली आहे. तिचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण झाले आहेत. सुहानीने दंगलमध्ये बबिता फोगाटची बालपणीची भूमिका साकारली होती.
सुहानीने 2016 मध्ये दंगल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपटातील छोटी बबिता लोकांना प्रचंड आवडली. तिच बबिता आता किती मोठी झाली आहे ते तुम्ही पाहू शकता.
दंगल चित्रपटानंतर सुहानी इंडस्ट्रीपासून थोडी दूर झाली असेल. परंतु ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे सुंदर फोटो हे शेअर करत असते.
सुहानी या फोटोमध्ये हसत हसत नेहा कक्करसोबत पोज देताना दिसत आहे. दंगलची छोटी बबिता फोगाट आता खूप सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर 20 हजारांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.
सुहानी भटनागरला सोशल मीडियावर 20 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. सुहानीचे इन्स्टा हँडल पाहिल्यास तुम्हाला तिचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे फोटो दिसतील.
चाहते लवकरच सुहानीला एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.