अनन्या पांडेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, फॅन्सकडून लाइक्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 21:00 IST2019-03-27T21:00:00+5:302019-03-27T21:00:00+5:30

चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आपल्या बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज आहे. येत्या काळात अनन्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे.

अनन्याची इंस्टाग्रामवर फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. तिच्या प्रत्येक फोटोला रसिक लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळते.

अनन्या पांडेचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिलं असेल तर तिच्या फन फॉलोइंगबाबत तुम्हाला समजेलच.

पहिला सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच तिचे फॅन्स तिच्या अदांवर घायाळ झाले आहेत.

अनन्या फक्त 19 वर्षांची आहे. परंतु फॅशन आणि स्टाइलबाबत असलेली तिची चॉइस अत्यंत क्लासी आहे.


















