उत्तराखंडची मुलगी, ७ वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत आली; ८०० कोटींचा सिनेमा करुन रातोरात झाली स्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 14:01 IST2024-12-23T13:46:54+5:302024-12-23T14:01:55+5:30

सुरुवातीच्या सिनेमांमध्ये केलं उत्तम काम, मात्र खरी लोकप्रियता ८०० कोटींच्या सिनेमातील 'त्या' सीनमुळेच मिळाली

अनेक छोट्या गावातील मुला मुलींचं टीव्ही किंवा बॉलिवूडमध्ये येऊन हिरो-हिरोईन होण्याचं स्वप्न असतं. त्या स्वप्नाच्या दिशेने घरदार सोडून ते मायनगरीत येतात. कोणी यशस्वी होतं तर काहींना अपयशही येतं.

अशीच एक अभिनेत्री जी पहाडी भागातून आली. सुरुवातीला मॉडेलिंग, जाहिराती, युट्यूब व्हिडिओ करत नशीब आजमावलं. अचानक नशीब पालटलं आणि थेट ८०० कोटी कमावणाऱ्या सिनेमातून ती नावारुपाला आली.

ही अभिनेत्री आहे तृप्ती डिमरी (Tripti Dimri). १९९४ साली तिचा उत्तराखंडमधील गढवाल गावात जन्म झाला. तिने सुरुवातीचं शिक्षण तिथेच घेतलं. यानंतर दिल्ली विश्वविद्यालयातून मानसशास्त्राचा अभ्यास केला.

तृप्तीने पुण्यातील FTII मध्ये प्रवेश घेतला. यानंतर तिने मुंबईत येऊन ऑडिशन द्यायला सुरुवात केली. २०१७ साली 'पोस्टर बॉइज' सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

तृप्तीने आतापर्यंत ८ सिनेमे केले आहेत. 'लैला मजनू', 'बुलबुल', 'कला', 'अॅनिमल', 'भूलभुलैय्या ३', 'बॅड न्यूज', 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' या सिनेमांचा समावेश आहे.

तृप्तीने 'कला', 'लैला मजनू' सारखे सुंदर सिनेमे दिले मात्र ती 'अॅनिमल' सिनेमामुळे जास्त चर्चेत आली. यात तिने रणबीर कपूरसोबत न्यूड सीनही दिला. यानंतर तृप्तीकडे सिनेमांची रांगच लागली.

आगामी 'धडक २', 'आशिकी ३', 'अॅनिमल पार्क' या सिनेमांमध्ये ती दिसणार आहे. शिवाय आणखीही काही सिनेमांची चर्चा सुरु आहे.

तृप्ती वैयक्तिक आयुष्यात सुरुवातीला अनुष्का शर्माच्या भावाला डेट करत होती. तर सध्या ती बिझनेसमन सॅम मर्चंसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघंही सध्या एकत्र व्हॅकेशनवर गेले आहेत.