'बॉर्डर'मधील सुनील शेट्टीची सुंदर पत्नी सध्या काय करते?; २८ वर्षांनंतर ओळखूच येणार नाही इतकी बदलली
By देवेंद्र जाधव | Updated: October 1, 2025 13:27 IST2025-10-01T13:08:44+5:302025-10-01T13:27:30+5:30
'बॉर्डर' सिनेमात झळकलेली सुनील शेट्टीची सुंदर बायको नुकतीच नवरात्र उत्सवात सहभागी झाली होती. तेव्हा तिला बघून अनेकांनी तिला ओळखलं नाही

१९९७ मध्ये प्रदर्शित झालेला 'बॉर्डर' (Border) हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या देशभक्तीपर चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टीच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री शरबानी मुखर्जीने साकारली
शरबानी यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. त्या सुनील शेट्टींच्या पत्नीच्या भूमिकेत खूप सुंदर दिसल्या होत्या.
जवळपास २८ वर्षांनंतर शरबानी मुखर्जींचा लूक खूप बदलला आहे. अलीकडेच त्या मुखर्जी कुटुंबाच्या नवरात्री उत्सवात सहभागी झालेल्या दिसल्या
शरबानी यांचा लूक आता बदलला असून त्या ओळखूच येत नाहीयेत. शरबानी ही काजोलचे काका रोनो मुखर्जी यांची मुलगी आहे. याशिवाय दिग्दर्शक अयान मुखर्जी हा शरबानी यांचा चुलत भाऊ आहे
'बॉर्डर'ला मिळालेल्या यशामुळे शरबानी मुखर्जीकडून बॉलिवूडला मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही.
'बॉर्डर'नंतर त्यांनी साऊथ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले. परंतु अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी चित्रपटापासून दूर होण्याचा निर्णय घेतला.
शरबानी दरवर्षी मुखर्जी कुटुंबाच्या नवरात्री उत्सवात दिसतात. तिथे त्या संपूर्ण परिवारासह आनंदात वेळ घालवतात. त्यांना बघून अनेकांना 'बॉर्डर' चित्रपटातील त्यांच्या सीनची आठवण येते.