५६ वर्षांचा झाला बॉलिवूडचा सिंघम, अजय देवगणसोबत रोमँटिक अंदाजात दिसली काजोल, म्हणाली- वयाने माझ्यापेक्षा मोठे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:47 IST2025-04-02T18:44:00+5:302025-04-02T18:47:35+5:30

Ajay Devgan And Kajol: अजय देवगण आज ५६वा वाढदिवस साजरा करतो आहे. त्यानिमित्ताने त्याच्या चाहत्यांची त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगणसाठी २ एप्रिल हा दिवस खूप खास आहे. कारण आज अभिनेत्याचा वाढदिवस आहे.

अजय देवगण आज ५६वा वाढदिवस साजरा करतो आहे. त्यानिमित्ताने त्याच्या चाहत्यांची त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मात्र त्याला त्याच्या लेडी लव्हकडून खास शुभेच्छा मिळाल्या आहेत. काजोलने त्यांचा रोमँटिक फोटो शेअर करत अजय देवगणला शुभेच्छा दिल्या आहेत.

काजोलने फोटो शेअर करत लिहिले की, सर्व कूल लोकांचा जन्म ऑगस्टमध्ये झाला होता. तरीदेखील तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. नेहमीच वयाने माझ्यापेक्षा मोठे राहण्यासाठी आभारी आहे.

काजोलचा वाढदिवस ऑगस्टमध्ये असतो. ती अजयपेक्षा वयाने ६ वर्ष लहान आहे.

काजोलच्या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. चाहते या पोस्टवर अजय देवगणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अजय देवगण शेवटचा आझाद सिनेमात दिसला होता. लवकरच तो रेड २ आणि सन ऑफ सरदारमध्ये दिसणार आहे.