'विवाह' मधील 'छोटी' आठवतेय? आता दिसते फारच सुंदर! १९ वर्षात इतका बदलला अभिनेत्रीचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 17:40 IST2025-09-29T17:33:27+5:302025-09-29T17:40:15+5:30

'विवाह' चित्रपटातील छोटी आता दिसते फारच ग्लॅमरस, फोटो होतायेत व्हायरल

सिनेसृष्टीत मुख्य भूमिका न करताही काही अभिनेते अभिनेत्री कायम प्रेक्षकांना लक्षात राहतात. त्यापैकीच आपल्या अभिनय शैलीने प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अमृता प्रकाश.

अमृताने ४ वर्षांची असतानाच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. 'तुम बिन'या हिंदी चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेतून अमृताने मोठ्या पजद्यावर पदार्पण केलं.

केवळ चित्रपटच नव्हे तर अमृता प्रकाश अनेक गाजलेल्या मालिका आणि जाहिरातींमध्ये झळकली आहे. मात्र, तिला खरी ओळख विवाह या चित्रपटाने दिली.

अमृता राव आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २००६ साली रिलीज झाला. या चित्रपटात तिने पूनमची (अमृता राव) च्या बहिणीची म्हणजेच छोटी हे पात्र साकारलं होतं.

'विवाह' मध्ये सावळ्या रंगाची आणि साधी दिसणारी छोटी आता पूर्वीपेक्षा फार वेगळी दिसते.

अमृता प्रकाश सध्या अभिनय क्षेत्रापासून दुरावली असली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

अमृता प्रकाश आता खूपच सुंदर दिसते. सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहून चाहते तिला ओळखू शकले नाहीत.