थेट अनिल कपूर यांच्याशी भिडलेली, निर्मात्याच्या लगावलेली कानशिलात; रागीट स्वभावामुळे संपलं 'या' अभिनेत्रीचं करिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:11 IST2025-11-11T16:52:19+5:302025-11-11T17:11:59+5:30
शबाना आझमी यांची भाची! एकेकाळी सौंदर्यांची व्हायची चर्चा, रागीट स्वभावामुळे होत्याच नव्हतं झालं, आता काय करते?

हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळण्यासाठी नशीब असावे लागते असे म्हटले जाते. नशीबाने दगा दिला तर हिंदी चित्रपटसृष्टी निष्ठूर होत एखाद्याला प्रवाहातून कसे बाहेर फेकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे अभिनेत्री फराह नाज.

फराह नाज हे ८०-९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव. आपल्या कारकिर्दीत अभिनेत्रीने राजेश खन्ना, राज बब्बर तसेच धर्मेंद्र, गोविंदा यांसारख्या दिग्गज


नसीब अपना अपना, यतीम, ईनामदार, घर धर की कहानी अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. परंतु, तिला तसा स्टारडम मिळाला नाही. फराह नाज ही अभिनेत्री शबाना आझमी यांची भाची आणि तब्बूची बहीण आहे.

त्यानंतर अभिनेत्री इंडस्ट्रीतून अचानक गायब झाली आणि विदू दारा सिंह यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. हे नातंही फार काळ टिकलं नाही.

दरम्यान,उत्तम अभिनय कौशल्य असूनही अभिनेत्रीच्या रागीट स्वभावामुळे तिच्या करिअरला उतरली कळा लागली. असंही सांगण्यात येतं की, अभिनेत्री छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडायची.


इतकंच नाही असंही सांगितलं जातं की,'रखवाला' चित्रपटात अनिल यांना या फरहाऐवजी माधुरीला घ्यायचं होतं. हा प्रकार फरहाला समजताच तिने संतापून अभिनेत्याला थेट धमकी दिली होती.

















