सोनाली बेंद्रेच्या नवऱ्याला आणि लेकाला कधी पाहिलंय का? पती आहे प्रसिद्ध निर्माता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 12:56 IST2022-03-15T12:53:31+5:302022-03-15T12:56:58+5:30
Sonali bendre : सोनालीचे पती आणि मुलगा सोशल मीडियावर फारसे सक्रीय नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रेक्षकांचा कायम प्रयत्न असतो.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि तितकीच लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे.
हम साथ साथ है, दिलजले, मेजर साब अशा कितीतरी चित्रपटातून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीला आली.
काही काळापूर्वीच सोनालीने कर्करोगासारख्या असाध्य आजारावर मात करत पुन्हा कलाविश्वात सक्रीय झाली आहे.
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सोनालीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच आतुर असतात.
सोनालीचे पती आणि मुलगा सोशल मीडियावर फारसे सक्रीय नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रेक्षकांचा कायम प्रयत्न असतो.
सोनालीच्या नवऱ्याचं नाव गोल्डी बेहल असं आहे. सोनाली आणि गोल्डीने २००२ मध्ये लग्न केलं.
गोल्डी प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि स्क्रिन रायटर आहेत.
‘बस इतनासा ख्वाब है’,‘द्रोणा’ आणि ‘आय, मी और मैं’ या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.
गोल्डी हे दिग्दर्शक रमेश बेहल यांचे सुपूत्र आहेत.
गोल्डी आणि सोनाली यांना रणवीर हा एक मुलगादेखील आहे.
रणवीरही कलाविश्वात वा सोशल मीडियावर फारसा सक्रीय नाही.