आधी कोरोनाचा संसर्ग अन् दीड वर्ष केला पॅरालिसिसचा सामना! मृत्यूच्या दाढेतून परतली 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:46 IST2025-09-30T18:35:47+5:302025-09-30T18:46:09+5:30

दीड वर्ष केला पॅरालिसिसचा सामना अन्...; मृत्यूच्या दाढेतून परतली 'ही' अभिनेत्री, कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी

चित्रपटसृष्टी म्हणजे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

जोपर्यंत तुम्हांला यश मिळते तोपर्यंत तुम्हांला ओळख असते मात्र वाईट दिवस सुरु झाले तर रोज तुमच्याबरोबर फिरणारे देखील तुम्हांला ओळखत नाहीत.अशाच दुर्दैवी कलावंतांपैकी एक म्हणजे अभिनेत्री शिखा मल्होत्रा.

बॉलिवूडमध्ये नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्वप्ननगरी मुंबईत पाऊलं ठेवलं. मात्र, नशीबाने तिला साथ दिली नाही.

शिखाने २०१६ मध्ये शाहरुख खानच्या 'फॅन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती तापसी पन्नुच्या 'रनिंग शादी' या चित्रपटात झळकली.

मात्र, ही अभिनेत्री एवढ्यावरच थांबली नाही. २०२० मध्ये शिखा मल्होत्रा 'कांचली' या सिनेमात मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. मात्र, या अभिनेत्रीला वैयक्तिक आयुष्यात संकटांना समोरं जावं लागलं.

न्यूज १८ हिंदीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिखाने तिच्या आजारपणाबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं होतं. तिच्या या आजारपणात कुटुंबीयांनी तिला खूप आधार दिला, असंही तिने या मुलाखतीत सांगितलं.

२०२० मध्ये कोरोना आल्यानंतर तिने रुग्णालयांमध्ये जवळपास १०-११ महिने रुग्णांची सेवा केली होती.याचदरम्यान, तिला कोरोनाचं निदान झालं आणि तिच्यावर हॉस्पिटमध्ये राहण्याची वेळ आली. यामुळे अभिनेत्रीला अडीच वर्षे पॅरालिसिसचा सामना करावा लागला. त्यामुळे तिला चालताही येत नव्हतं.

मात्र, शिखा डगमगली नाही. तिने धैर्याने या आजारपणावर मात करत आज ती तिच्या पायावर उभी आहे. लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिखा मल्होत्रा एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम गायिका आणि नृत्यांगणा म्हणूनही ओळखली जाते.