शहनाज गिलनं पहिल्यांदाच शेअर केला स्वतःचा खास 'डाएट प्लॅन', जिममध्येही जाण्याची गरज नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:50 IST2025-02-11T18:33:53+5:302025-02-11T18:50:22+5:30
वजन वाढवणे सोपे असले, तरी ते कमी करणे तितकेच कठीण आहे. या अभिनेत्रीने हे कसे शक्य केले? जाणून घ्या...

Shehnaaz Gill: 'पंजाबची कतरिना कैफ' अशी ओळख करु पाहणाऱ्या, 'बिग बॉस'च्या १३व्या पर्वात झळकलेली शहनाज गिल आज बॉलिवूडची एक ग्लॅमरस, हॉट अभिनेत्री आहे.
सलमान खानच्या 'किसी का भाई किसी जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शहनाजच्या नावाची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा होतेय.
शहनाजचा वेट लॉसचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर शहनाजने ज्या पदार्थांचा वापर केला, त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता.
शहनाज गिलने ६ महिन्यांत ५५ किलो वजन कमी केलं होतं. मिर्ची प्लसवर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी बोलताना शहनाजने आपल्या वेट लॉसविषयी (Shehnaaz Gill Diet Plan)सांगितलं.
शहनाजच्या दिवसाची सुरुवात एक कप चहाने करते आणि हळदीच्या पाण्यासोबत सफरचंद सायडर व्हिनेगर पिते. नाश्त्यात ती मूग डोसा किंवा मेथी पराठे खाते. नाश्ता प्रथिनेयुक्त असावा हे ती कायम निश्चित करते.
टाईम्स फूडीला दिलेल्या मुलाखतीत, शहनाज गिलने तिची पोह्यांची रेसिपी शेअर केली. शहनाज गिलने सांगितले की पोहे हा एक नाश्ता आहे, जो ती दररोज सकाळी खाऊ शकते. पोह्यांची रेसिपी शेअर करताना शहनाजने सांगितले की, ती एका पॅनमध्ये गरम तेलात जिरे आणि मोहरी घालते आणि चिरलेली सिमला मिरची, ब्रोकोली आणि गाजर यांसारख्या भाज्या परतून मुठभर पोहे घालते. ती म्हणाली "मी जास्त भाज्या ठेवते आणि पोहे कमी ठेवतो".
यासोबतच ती एक वाटी ग्रॅनोला आणि दही देखील खाते. तर दुपारच्या जेवणात ती एक वाटी मसूर, अंकुरलेले सॅलड आणि देशी तूप लावलेल्या रोटीसोबत टोफू स्क्रॅम्बल खाते. यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर देणारे सर्व घटक आहेत.
ती म्हणाली, "संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडे तूप गरम करुन घेते. त्यात काही मखाने किंवा फॉक्स नट्स घालून भाजून घेते. हा नाश्ता मी बाहेरच्या शूटिंगसाठीही वापरते.
रात्रीच्या जेवणात ती खिचडी खाते. त्यात एक वाटी दही आणि भोपळ्याचा सूप घेते. ज्यातून निरोगी जेवणासाठी योग्य पोषक तत्वे, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. या सर्व गोष्टींचा वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदा मिळतो.
शहनाज म्हणाली, मी दिवसभरात तीन-चार लिटर भरपूर पाणी पिते. यासोबत तिने नियमित योग किंवा ध्यान करण्याचा सल्ला दिला.