'आपकी नजरो नें समझा...' दिया मिर्झाचा घायाळ करणारा अंदाज, तुम्हीही पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 04:08 PM2024-05-07T16:08:41+5:302024-05-07T16:14:03+5:30

दिया मिर्झा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

९० च्या दशकात आपल्या अदाकारिने तसेच अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे दिया मिर्झा.

'रहना है तेरे दिल मैं' या चित्रपटातून दिया मिर्झा नावारुपाला आली.

आपल्या गोड आवाजाने आणि सौंदर्याने तिनं चाहत्यांची मनं देखील जिंकली.

सध्या ही अभिनेत्री एका वेगळ्या कारणाने चर्चेचा मुद्दा बनली आहे.

अभिनेत्री दिया मिर्झा सध्या तिच्या बाळाच्या संगोपनात व्यस्त असल्याने चित्रपटांपासून तशी दूरच आहे.पण सोशल मिडियावर मात्र ती बऱ्याचदा ॲक्टीव्ह असते.

तिने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

'लगे रहो मुन्ना भाई', 'शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला' तसेच 'संजू' यांसारखे दमदार चित्रपट तिने बॉलिवूडला दिले.

या फोटोंची खासियत म्हणजे यामध्ये दियाने अतिशय सुंदर मरून कलरचा लेहेंगा परिधान केला आहे.

त्यावर सोनेरी धाग्यांनी केलेले वर्क असलेला तिचा लेहेंगा तिला खरोखरंच डिसेंट लूक देणारा आहे.