कुणी पेन विक्रेता तर कुणी केलं वेटरचं काम; अभिनयापूर्वी 'हे' सेलिब्रेटी या क्षेत्रात होते कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 17:40 IST2024-01-08T17:31:21+5:302024-01-08T17:40:01+5:30
हिंदी चित्रपटसृष्टी ही भारतातील सगळ्यात मोठी चित्रपटसृष्टीपैकी एक आहे. पण या अभिनयाच्या विश्वात आपली ओळख निर्माण करण्यासाठी काही कलाकरांना मोठ्या संघर्षाला तोंड घ्यावे लागले. अशा कलाकारांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दसल आपण जाणून घेणार आहोत.

रजनीकांत
बॉलिवूडचा थलैवा सुपरस्टार रजनीकांत आज जगभर प्रसिद्ध आहेत. पण चित्रपटात येण्यापूर्वी या अभिनेत्याने बस कंडक्टर म्हणून काम केलं होतं. आज केवळ भारतातच नाही तर विदेशातही रजनीकांत यांची जबरदस्त फॅन फॉलोविंग पाहायला मिळते.
रणवीर सिंग
बॉलिवूडमधील सर्वात उत्साही अभिनेता रणवीर सिंगला ओळखलं जातं. विविधांगी भूमिका साकारून रणवीर सिंग प्रेक्षकांच लक्ष वेधून घेत असतो. पण एकेकाळी या अभिनेत्याने एका एजन्सीमध्ये कॉपी रायटरचं काम केल्याचं सांगितलं जातं.
जॉनी लिव्हर
मीडीया रिपोर्ट्सनुसार, झोपडपट्टीत राहून दारुच्या ठेल्यावर काम करणारा अभिनेता आज आघाडीचा विनोदवीर म्हणून प्रसिद्ध आहे. चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवण्यापूर्वी जॉनी लीव्हर रस्त्यावर पेन विकायचे.
बोमन इराणी
एका मध्यमवर्गीय पारसी कुटुंबात जन्मलेला अभिनेत्याने वयाच्या केवळ सहा महिन्यात आपल्या वडिलांना गमावलं होतं. कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी एक दिवस ताज हॉटेलच्या मॅनेजरची भेट घेऊन हॉटेलच्या छतावर टॉपला असलेल्या रेस्टॉरंटमध्ये काम केल्याचा खुलासा त्यांनी एका मुलाखती दरम्यान केला. वयाच्या ४० व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत अभिनेते बोमन इराणी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
नवाजुद्दीन सिद्दीकी
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आजवर अनेक भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपटात येण्यापूर्वी वॉचमन म्हणून काम केले होते.
अर्शद वारसी
मुन्नाभाई MBBS या सिनेमात सर्किट ही भूमिका साकारुन विशेष लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे अर्शद वारसी. अभिनेता अर्शद वारसीने चित्रपटात येण्यापूर्वी बिंदी-लिपस्टिक विक्रेता म्हणून काम केले होते.