PICS : मॉडेलिंग ते मस्तानी...! इतकी बदलली दीपिका पादुकोण, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 12:43 IST2021-01-05T12:32:17+5:302021-01-05T12:43:44+5:30
आज दीपिकाचा वाढदिवस...

12-13 वर्षांत दीपिका कमालीची बदलली आहे. आज दीपिकाचा वाढदिवस. तिच्या या वाढदिवशी आम्ही तिचे काही जुने फोटो घेऊन आलो आहोत. तेव्हा पाहा तर...
आजघडीला दीपिका पादुकोण बॉलिवूडची टॉपमोस्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिची प्रत्येक अदा चाहत्यांना वेड लावते. आज सुंदर आणि ग्लॅमरस दीपिकाचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत.
अर्थात इथपर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. याठिकाणी पोहोचण्यासाठी दीपिकानेही अपार मेहनत केली. चित्रपटांत येण्यापूर्वी तिने मॉडेलिंग केले. या स्ट्रगलिंग काळातील दीपिकाला आज तुम्ही ओळखूही शकणार नाही.
बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी दीपिका हिचा जन्म कोपनहेगन येथे झाला. बंगळुरु येथे तिने तिचे शिक्षण आणि बॅडमिंटनवरील प्रेम संपादित केले.
किशोरवयीन वयात असताना ती राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळली. मात्र, मॉडेल होण्याचा मार्ग स्वीकारल्याने तिला बॅडमिंटनपटू होण्याच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागले.
चित्रपटांत येण्यापूर्वी दीपिका मॉडेल होती. कॉलेजच्या दिवसांपासूनच तिने मॉडेलिंग सुरु केले होते.
बेंगळुरुच्या नॅशनल लॉ कॉलेजमध्येही तिने रॅम्प वॉक केला होता. पुढे हीच दीपिका लिरिल, डाबर दंत मंजन, क्लोजअप, लिम्का या नावाजलेल्या ब्रॅण्डची ब्रॅण्ड अॅॅम्बिसीडर बनली.
2006 हे वर्ष दीपिकासाठी खास म्हणायला हवे. कारण याच वर्षी ती किंगफिशर कॅलेंडर गर्ल बनली. तिला मॉडेल आॅफ द ईअर म्हणून निवडले गेले. किंगफिशर स्विमसूट कॅलेंडरमध्ये ती सिलेक्ट झाली.
हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा’मध्ये दिसली. तोपर्यंत दीपिकाचा बॉलिवूडमध्ये येण्याचा इरादा पक्का झाला होता.
अनेक संघर्षार्नंतर 2006 मध्ये तिला कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्या’ची आॅफर मिळाली. मात्र, बॉलिवूडमध्ये तिचा डेब्यू चित्रपट 2007 मध्ये झाला.
‘ओम शांती ओम; या पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली.
या चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट फिमेल डेब्यू’ या कॅटेगरीत फिल्मफेअर अवार्ड मिळाला. यानंतर मात्र दीपिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही.