Birthday Special : बाईकवेड्या गुल पनागचे 10 खास फोटो आणि 10 खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 08:00 AM2021-01-03T08:00:00+5:302021-01-03T08:00:02+5:30

ती बुलेट चालवते, विमान उडवते, रेसिंग कार पळवते, तिने सिनेमे केलेत, निवडणूकही लढवली, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री गुल पनाग हिच्याबद्दल.

ती बुलेट चालवते, विमान उडवते, रेसिंग कार पळवते, तिने सिनेमे केलेत, निवडणूकही लढवली, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री गुल पनाग हिच्याबद्दल. आज बाईकवेड्या गुलचा वाढदिवस.

3 जानेवारी 1979 साली चंदीगड येथे जन्मलेल्या गुल पनागचे खरे नाव गुलकीरत कौर पनाग आहे. ती एक पायलट, फार्म्युला कार रेसर, अभिनेत्री आणि राजकारणी आहे.

गुल पनागचे वडील आर्मी आॅफिसर होते. भारतातल्या अनेक शहरात तिचे बालपण गेले. गुलने राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. हुशार विद्यार्थीनी असलेल्या गुलने त्याकाळात अनेक डिबेट कॉम्पिटेशन जिंकलेत.

वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षीच गुल पनाग हिने ‘मिस इंडिया’ किताब पटकावला. त्यानंतर ती विश्वसुंदरी स्पर्धेतही सहभागी झाली होती.

2003 साली प्रदर्शित झालेला ‘धूप’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

गुल पनागने वेगवेगळ्या क्षेत्रात नशीब आजमावले. पण तिची पहिली आवड आहे ती म्हणजे,बाईक चालवणे. रॉयल एनफील्ड ही बाईक चालवताना तिचा तोरा काही औरच असतो.

गुल पनाग फाम्युर्ला ई रेसिंग कार चालवणारी पहिली भारतीय महिला बनली. रेसिंग कारमध्ये पाऊल ठेवण्याआधी गुलने त्याचे प्रशिक्षण घेतले होते. रेसिंग कार चालवण्यासाठी एक खूप मोठा अनुभव शिवाय फिटनेस लागतो. गुल या दोन्ही कसोट्यांवर खरी ठरली.

2011 मध्ये गुलने तिचा पायलट मित्र ऋषी अटारीसोबत लग्न केले. गुल पनागच्या लग्नात तिचा नवरा घोड्याऐवजी चक्क ‘बाईक‘वरच स्वार होऊन आला होता. विवाहाच्या दिवशीही गुल पनाग हिला बाईक चालवण्याचा मोह आवरता आला नव्हता.

लग्नाच्या आठ वर्षानंतर गुल आई बनली. पण सहा महिन्यापर्यंत ती आई बनल्याची कोणाला कानोकान खबर नव्हती. मुलाच्या जन्माची बातमी तिने सहा महिने जगापासून लपवून ठेवली.

गुल पनागला कुत्र्यांवर खूप प्रेम आहेत. सकाळ -संध्याकाळ ती आपल्या कुत्र्यांसोबतच खेळताना दिसते.

2014 साली गुल पनाग आम आदमी पार्टीशी जोडली गेली. 2014 ची लोकसभा निवडणूक लढली. अर्थात तिला पराभव पत्करावा लागला.