'वॉन्टेड' फेम अभिनेत्री पुन्हा ट्रोल, आयेशा टाकियाचा लूक पाहून चाहतेही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:09 IST2025-10-29T15:00:11+5:302025-10-29T15:09:57+5:30
आयेशाचे लेटेस्ट फोटो पाहिलेत का?

'वॉन्टेड' फेम अभिनेत्री आयेशा टाकिया (Ayesha Takia) आठवतेय? सलमान खानसोबत तिची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली.

आयेशा टाकियाने 'दिल मांगे मोर','यू मी और हम','टार्झन द वंडर कार','संडे','पाठशाला','सोचा ना था','फुल एन फायनल' अशा काही सिनेमांमध्येही भूमिका साकारली.

२००९ साली आयेशाने फरहान आजमीशी लग्न केलं. फरहान हा समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांचा मुलगा आहे. अशा प्रकारे आयेशा राजकीय कुटुंबाची सून झाली.

आयेशाने अचानक लग्न केल्याने सर्वांना धक्का बसला. इतकंच नाही तर तिने लग्नानंतर सिनेमांमध्येही कामही केलं नाही. चाहत्यांनी तिला स्क्रीनवर खूप मिस केलं.

मधल्या काळात आयेशा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. बोटॉक्स, फिलर्स, ओठांचा सर्जरी केल्याने तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं.

नुकतेच आयेशाने हे सेल्फी पोस्ट केले आहेत. निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये तिने फोटो शेअर केलेत. यातही तिचा चेहरा पाहून कमेंट्समध्ये लोक तिला खूप ट्रोल करत आहेत.

आयेशाने २०१३ साली मुलाला जन्म दिला. त्याचं नाव मिखाइल असं आहे. आता तो १२ वर्षांचा आहे. लेकासोबत ती सोशल मीडियावर अनेक फोटो अपलोड करत अशते.

















