लेकीच्या लग्नात अण्णा सुनील शेट्टीने अथिया आणि केएल राहुलसोबत केला डान्स, पहा संगीत सेरेमनीचे Unseen Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 18:54 IST2023-01-30T18:32:24+5:302023-01-30T18:54:56+5:30
लेकीचं लग्न म्हणलं की बाप आनंद आणि अश्रू दोनही असणारच. सुनील शेट्टी, अथिया आणि केएल राहुलचे काही क्षण कॅमेऱ्यात कैद झालेत.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने नुकतेच क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले. (फोटो- इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
अलीकडेच अथिया शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर संगीत आणि मेहंदी सेरेमनीचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये सुनील शेट्टी अथिया केएल राहुलसोबत डान्स करताना दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
सुनील शेट्टीचा मुलगी अथियाच्या फंक्शनमधील डान्स त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
अण्णाच्या खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये हे शाही लग्न पार पडलं.