बेबी डॉल मैं सोने दी! अरबाजची एक्स गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीचं बोल्ड फोटोशूट, फोटोंची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 04:44 PM2024-05-22T16:44:52+5:302024-05-22T16:51:54+5:30

जॉर्जिया अँड्रियानी पुन्हा एकदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी तिच्या जबरदस्त फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते.

जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

पुन्हा एकदा जॉर्जियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जॉर्जियाचे हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे.

जॉर्जियाचा हा लूक तिच्या बर्थडे पार्टीतील आहे. जॉर्जियानं तिचा वाढदिवस २१ मे २०२४ रोजी साजरा केला.

यानिमित्ताने तिनं एका पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीत ती गोल्डन ड्रेसमध्ये सोनपरीसारखी दिसत होती.

जॉर्जिया गोल्डन ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे. या फोटोंमध्ये ती खूप बोल्ड पोज देताना दिसत आहे. जे पाहून चाहत्यांना तिचे वेड लागले आहे.

जॉर्जिया अशा सुंदरींपैकी एक आहे जी केवळ स्टायलिश दिवाच नाही तर पोझ देण्याच्या बाबतीतही आघाडीवर आहे. तिचा हा फोटो पाहिला तर ती तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

जॉर्जिया आणि अरबाज खान हे रिलेशनशिपमध्ये होते. पण, दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर अरबाजने शुरा खानशी लग्न केले. अरबाजच्या दुसऱ्या लग्नानंतर जॉर्जियाने एक मुलाखत दिली होती. त्यात ती अरबाज आणि मलायकाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. अरबाजसोबत ब्रेकअप झालं असलं तरी माझ्या मनात त्याच्याविषयी नेहमीच भावना असतील, प्रेम असेल, असंही ती म्हणाली होती.

अरबाजशी ब्रेकअप केल्यानंतर तिच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. जॉर्जिया आणि सिकंदर यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. सिकंदर हा अनुपम खेर यांचा सावत्र मुलगा आहे.