अमिताभ यांचा सर्वात वाईट सिनेमा! स्क्रीनिंगला जया बच्चन अर्ध्यातच थिएटरमधून निघून गेल्या होत्या
By देवेंद्र जाधव | Updated: May 13, 2025 17:54 IST2025-05-13T17:39:41+5:302025-05-13T17:54:08+5:30
अमिताभ बच्चन यांचा असाही सिनेमा जो जया बच्चन पूर्ण पाहूच शकल्या नाहीत. अर्ध्यातूनच थिएटरमधून निघून गेल्या होत्या. कोणता होता हा सिनेमा?

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे शहनशाह म्हणून ओळखले जातात. अमिताभ यांनी अनेक चांगले आणि दर्जेदार सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत, पण..
अमिताभ बच्चन यांचा एक असाही सिनेमा होता जो जया बच्चनही पूर्ण पाहू शकल्या नाहीत. अमिताभ यांच्या कारकीर्दीतील वाईट सिनेमांपैकी एक हा सिनेमा मानलो जातो
या सिनेमाचं नाव आहे 'मृत्यूदाता'. १९९० च्या काळात बिग बींचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर इतके चालत नव्हते. लोकांनी बिग बींच्या सिनेमांकडे पाठ फिरवली होती
१९९२ नंतर १९९७ साली अमिताभ यांचा 'मृत्यूदाता' हा सिनेमा लोकांच्या भेटीला आला. बिग बजेट असलेल्या या सिनेमाची निर्मिती स्वतः अमिताभ यांनी केली होती.
अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन या स्पष्टवक्त्या आहेत हे आपल्या सर्वांना माहितच आहे. मृत्यूदाताचं स्क्रीनिंगच्या वेळी अमिताभ जया बच्चन यांना घेऊन गेले
सिनेमा इतका वाईट होता जया बच्चन यांना हा सिनेमा पाहवत नव्हता. त्यामुळे त्या अर्ध्यातच थिएटरमधून उठून निघून गेल्या होत्या
या सिनेमामुळे अमिताभ यांचं मोठं नुकसान झालं. बिग बींचं करिअर संपलं अशीही चर्चा होती. परंतु नंतर अमिताभ यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन स्वतःचं स्थान पुन्हा भक्कम केलं ते आजतागायत