Then And Now : 56 वर्षांची झाली अलीशा चिनॉय, आता अशी दिसते ‘क्वीन ऑफ इंडीपॉप’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 01:26 PM2021-03-18T13:26:21+5:302021-03-18T13:35:27+5:30

अलीशा चिनॉयचे नाव घेतले की, ‘मेड इन इंडिया’ हे गाणे डोळ्यासमोर येते. सोबत अलीशाचा हसरा, गोबरा चेहराही डोळ्यांपुढे येतो. आज अलीशाचा वाढदिवस.

अलीशा चिनॉयचे नाव घेतले की, ‘मेड इन इंडिया’ हे गाणे डोळ्यासमोर येते. सोबत अलीशाचा हसरा, गोबरा चेहराही डोळ्यांपुढे येतो. आज अलीशाचा वाढदिवस. आज ही अलीशा कशी दिसते.

18 मार्च 1965 रोजी अहमदाबाद येथे जन्मलेल्या अलीशाचे खरे नाव सुजाता चिनॉय आहे. 1985 साली तिचा पहिला अल्बम ‘जादू’ रिलीज झाला. 1990 पर्यंत ती इंडियन पॉपची क्वीन अर्थात क्वीन ऑफ इंडीपॉप म्हणून ओळखली जाऊ लागली.

18 मार्च 1965 रोजी अहमदाबाद येथे जन्मलेल्या अलीशाला बप्पी लहरी यांनी बॉलिवूडमध्ये आणले.

1980 च्या काळात तिने बप्पीदांसोबत टारझन, डान्स कमांडो, गुरू, लव्ह लव्ह अशा अनेक सिनेमांसाठी काम केले.

पण अलीशाला खरी ओळख दिली ती 1995 साली आलेल्या ‘मेड इन इंडिया’ या गाण्याने. या गाण्याने अलीशा एका रात्रीत हिट झाली.

त्याआधी तिने अनेक गाणी गायली होती. पण ‘मेड इन इंडिया’ हे गाणे तिच्यासाठी सर्वार्थाने लकी ठरले.

अलीशाने अनु मलिक यांच्यासोबत अनेक गाणी गायली. मात्र नंतर दोघांमध्ये असे काही बिनसले की, आता दोघे एकमेकांचे तोंड पाहणेही पसंत करत नाहीत.

अनीशाने अनु मलिकवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता. यामुळे ती चर्चेत आली होती. अर्थात काहींच्या मते, हा तिचा पब्लिसिटी स्टंट होता.

अलीशाने 1986 साली तिचाच मॅनेजर राजेश झावेरीसोबत लग्न केले. मात्र 1994 साली दोघांचा घटस्फोटही झाला.

अलीशा आताश: इंडस्ट्रीतून जणू गायब झालीये. सोशल मीडियावर ती दिसते. पण तेवढ्यापुरतीच.