आईच्या कडेवर बसून हसताना दिसली राहा, आलियाने पहिल्यांदाच शेअर केला लेकीसोबतचा Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 06:01 PM2024-03-04T18:01:33+5:302024-03-04T18:09:01+5:30

कपूर कुटुंबाची लाडकी राहा बाहुलीसारखीच दिसते गोड!

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhat) यांची लाडकी लेक राहा कपूर (Raha Kapoor) एक वर्षाची आहे. गेल्या ख्रिसमसवेळी तिची पहिली झलक चाहत्यांनी पाहिली आणि सगळेच तिच्या प्रेमात पडले.

गोरीपान, निळे डोळे, तिच्या चेहऱ्यावरील निरागस भाव यावरुन चाहत्यांची नजरच हटत नाहीए. तिच्याकडे जितक्या वेळ बघावं कमीच वाटत आहे.

नुकतंच अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यामध्येही राहा कपूरचीच जास्त चर्चा होती. तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आणि चाहत्यांना तिला पुन्हा पुन्हा पाहण्याची संधी मिळाली.

राहा कपूरचा जन्म ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. रणबीर कपूरची लाडकी राहा एक वर्षाची झाली आणि चाहत्यांना तिची झलक पाहायला मिळाली. राहा कोणासारखी दिसते यावरुन तर सतत चर्चा होते. अनेकांनी रणबीरचे वडील दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासारखीच ती दिसते असं म्हटलं आहे.

राहाने सध्या सर्वांचंच लाईमलाईट खाल्लं आहे. रणबीरचं लेकीवर असलेलं प्रेम पाहून सर्वच त्याचं कौतुक करत आहेत. कपूर आणि भट कुटुंब सध्या तिच्याच अवतीभोवती आहे.

आता आलियाने पहिल्यांदाच राहासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यातला हा फोटो आहे. जंगल थीम असताना आलिया आणि लेक राहाने एकसारखीच फॅशन केली होती. या फोटोत राहाच्या स्माईलने तर सगळ्यांनाच घायाळ केलंय.

प्रिंटेड फ्रॉक, दोन छोट्या पोनी, पांढरे शूज या लूकमध्ये राहा दिसत आहे. आलियाने पहिल्यांदाच तिच्या इन्स्टाग्रामवर राहाचा फोटो पोस्ट केला आहे. नेहमी पापाराझींकडे बघून वैतागलेली राहा पहिल्यांदाच आता हसताना दिसत आहे. अगदी बाहुलीसारखाच तिचा लूक आहे.