"तर मी बिनधास्त किसिंग सीन, इंटिमेट सीन शूट करायला तयार"; आलियाचं 'बोल्ड' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 09:48 PM2023-08-02T21:48:21+5:302023-08-02T21:59:27+5:30

बॉलिवूडच्या हॉट अन् बोल्ड सीन्सबद्दल मांडली रोखठोक भूमिका

Alia Bhatt Kissing Scene Intimate Shoot: आलिया भट्ट सध्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या रिलीजमुळे चर्चेत आहे. या चित्रपटात आलिया ही रणवीर सिंग सोबत रोमान्स करताना दिसत आहे.

भूमिका कुठलीही असली तरी त्या भूमिकेसाठी लागणारी तयारी करण्यासाठी आलिया जीवापाड मेहनत करते. अनेक चित्रपटात आलियाने किसिंग सीन किंवा इंटिमेट बेडरूम सीनचे शूटही केले आहे.

आलियाने २ स्टेट्स मध्ये अर्जून कपूरसोबत, ब्रह्मास्त्रमध्ये पती रणबीर कपूर सोबत, राजी मध्ये विकी कौशल सोबत, स्टुडंट ऑफ दि इयरमध्ये वरूण धवन सोबत तर गली बॉय आणि रॉकी-रानी मध्ये रणवीस सिंग सोबत बिनदिक्कत किसिंग सीन्स दिले आहेत.

आलियाला याबद्दल दोन प्रश्न विचारण्यात आले. पहिला म्हणजे, अशा किसिंग सीनच्या वेळी तुझे वडिल महेश भट्ट काय म्हणतात? आणि दुसरा म्हणजे, तू किसिंग सीन शूट करण्याच्या वेळी काय विचार करतेस?

आलिया म्हणाली- "तुम्ही माझ्या वडिलांचे चित्रपट नक्कीच पाहिले असतील. ते बोल्ड सिनेमे बनवण्यासाठी ओळखले जातात. स्क्रीनवर मी त्यांची मुलगी नसते, एक अभिनेत्री असते त्यामुळे त्यांना माझ्या किंसिंग सीन किंवा इंटिमेट सीनशी हरकत नसावी असं मला वाटतं."