सकाळी ५.३०ला उठून ऐश्वर्या राय करते 'हे' खास काम; यामुळेच टिकून आहे ५२ वर्षीय अभिनेत्रीचं सौंदर्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:14 IST2025-11-20T12:10:04+5:302025-11-20T12:14:08+5:30

Aishwarya Rai : बॉलिवूडची ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय हिने नुकताच तिचा ५२वा वाढदिवस साजरा केला. पण तिचा फिटनेस पाहून कोणालाही वाटणार नाही की तिचे हे वय आहे.

बॉलिवूडची ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय हिने नुकताच तिचा ५२वा वाढदिवस साजरा केला. पण तिचा फिटनेस पाहून कोणालाही वाटणार नाही की तिचे हे वय आहे. असे असणे स्वाभाविक आहे! ऐश्वर्या तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते आणि यासाठी योग्य दैनंदिन दिनचर्या फॉलो करते. विशेष म्हणजे, या अभिनेत्रीच्या सौंदर्याचे रहस्य कोणतीही महागडी उत्पादने नसून साधी दिनचर्या आहे.

ऐश्वर्या रोज सकाळी ५.३० वाजता उठते. ही तिची अनेक वर्षांपासूनची सवय आहे. अभिनेत्रीचे मत आहे की, महिलांना एकाच वेळी अनेक कामे करावी लागतात. त्या एका दिवसात आई, पत्नी, मुलगी, अभिनेत्री अशा अनेक भूमिका निभावतात. त्यामुळे त्या एकाच कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

ऐश्वर्याच्या मते, स्वतःला फिट ठेवण्यासाठी तुम्हाला याच कामांमध्ये संतुलन राखून चालावे लागते. मुलगी आराध्याला शाळेत सोडण्यापासून ते शूटिंगपर्यंत, अशी सकाळी लवकर डेली रुटीन ती फॉलो करते.त्यामुळे तणाव कमी होतो.

आपल्या तजेलदार त्वचेबद्दल बोलताना ऐश्वर्या म्हणते की, महिलांना दिवसभर काम करावे लागते, त्यामुळे त्यांची त्वचा हायड्रेटेड ठेवणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.

ऐश्वर्या तिच्या त्वचेसाठी साध्या गोष्टींचा अवलंब करते. यासाठी ती काही घरगुती उपाय वापरते आणि घरीच काही फेसपॅक बनवून लावते. ती तिची त्वचा नेहमी स्वच्छ ठेवते आणि मॉइश्चरायझर वापरते.

ऐश्वर्या दिवसभरात भरपूर पाणी पिते. पूर्वी ती कमी पाणी प्यायची, पण आता हा तिचा नंबर १ नियम आहे. ती तिच्या दिवसाची सुरुवात पाण्यात लिंबू आणि मध मिसळून पिण्याने करते, ज्यामुळे तिची त्वचा हायड्रेटेड आणि डिटॉक्स राहते.

ऐश्वर्याला घरी बनवलेले साधे जेवण आवडते. ती कोणतीही स्ट्रिक्ट डायटिंग करत नाही, तर आहाराचे प्रमाण नियंत्रित करून आणि संतुलित आहार घेऊन स्वतःला तंदुरुस्त ठेवते.

तसेच, योगा आणि वॉक करून ती स्वतःला उत्साही, शांत आणि निरोगी ठेवते. तिच्या मते, आयुष्यातील आनंद हेच तुमच्या ग्लोइंग स्कीनचे रहस्य असते.