श्रद्धा कपूरचे नववधूप्रमाणे नटलेले फोटो आले समोर ,पुन्हा एकदा लग्नाच्या चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 12:41 IST2021-08-30T12:30:50+5:302021-08-30T12:41:42+5:30
गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर फोटोग्राफर रोहन श्रेष्ठासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. आता तिच्या लग्नाच्या बातम्याही जोर धरु लागल्या आहेत.

रिलेशनशिपमुळे चर्चेत असलेली श्रद्धाने अजून तरी यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया दिलेली नाही.
सोशल मीडियावरील श्रद्धाचे काही फोटो पाहून रसिकांमध्ये वेगळीच कुजबू सुरु झाली आहे.
या फोटोंमध्ये श्रद्धाचा लूक कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या श्रद्धाचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे.
लेंहग्यामध्ये श्रद्धाचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे.
श्रद्धाचा नववधू किंवा ब्रायडल लूक पाहून रसिकांध्ये तिच्या लग्नाची कुजबूज सुरु झाली.
लाडक्या श्रद्धाचा लूक तर लय भारी मात्र ती लग्न करणार की काय यावर चर्चा रंगत आहेत.
सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत.
त्यामुळेच आता श्रद्धालाही लग्नाचे वेध लागले आहेत की काय असेच चाहत्यांना वाटत आहे.
श्रद्धाचा हा लूक ब्रायडल फोटोशूट साठी आहे.ब्रायडल फोटोशूट साठी नववधू रुपात श्रद्धाने साजश्रृंगार केल आहे.