'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 15:50 IST2025-10-19T15:36:41+5:302025-10-19T15:50:39+5:30

Adah Sharma real name : अदा शर्माला नेमके कोणते अडथळे आले... नावाबद्दल ती काय बोलली... वाचा सविस्तर

अदा शर्मा हे नाव साऱ्यांसाठीच परिचयाचे आहे. अदाचा द केरला स्टोरी हा चित्रपट खूपच गाजला. त्यातील तिच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. तिने अनेक अँक्शन मुव्हीजमध्ये हिरोसोबत फाईट स्टंटही केले आहेत.

अदा शर्माबाबत एक मोठी गोष्ट म्हणजे, तिचे खरे नाव अदा शर्मा नसून दुसरेच आहे. जाणून घेऊया तिचे खरे नाव काय? तिने स्वत:चे नाव का बदलून घेतले आणि महत्त्वाचे म्हणजे, अदा शर्मा हे नाव कुठून आले?

अदा शर्मा हिचे खरे नाव चामुंडेश्वरी अय्यर असे आहे. आदाने स्वतःच याबाबत एका मुलाखतीमध्ये सगळी माहिती सांगितली. अदा शर्मा हे नाव ठेवण्यामागची नेमकी कहाणी काय होती, याबाबतही तिने सांगितले.

ती म्हणाली, "जर तुम्ही मला आत्ता विचारत असाल तर मला चामुंडेश्वरी अय्यर हे नाव खूपच कूल आणि ट्रेंडिंग वाटते, पण जेव्हा मी अभिनय करायचा ठरवला, तेव्हा मी खूपच लहान होते, मी अवघी १५ वर्षांची होते."

"माझ्या आसपासच्या लोकांनी मला असं सांगितले की चामुंडेश्वरी अय्यर नावाच्या मुलीला चित्रपटातली कामे मिळणार नाहीत. मला त्यावेळी फिल्मबाबत काहीच माहिती नव्हते, त्यामुळे मलाही ते पटले होते."

"आम्ही चित्रपटसृष्टीतील कोणालाच ओळखत नव्हतो, माझे दूर दूर पर्यंत कोणाशीही काहीच कनेक्शन नव्हते. मग मी विचार केला की जर माझ्या नावामुळेच मला अडथळे येणार असतील तर मी नाव बदलून टाकेन"

"दुसरे नाव कुठले घ्यायचे यावरही मी विचार केला. त्यावेळी मी कथ्थक क्लासमध्ये जायचे. मी माझ्या मैत्रिणीकडून सल्ला मागितला. ती म्हणाली, उमराओजान नाव ठेव. ते नाव मला आवडले पण तेही खूप मोठे होते."

"आम्ही ज्या कॅरेक्टरबद्दल बोलत होतो त्या कॅरेक्टरचे पूर्ण नाव उमराओजान अदा असे होते. मग त्यावरून मी माझे नाव अदा शर्मा असे ठरवून टाकले," अशी अतिशय मजेशीर कहाणी अदा शर्माने सांगितले.