#नोमेकअप #नोग्लॅमर बस...भक्ती, उर्मिला मातोंडकरने घेतलं कामाख्या देवीचं दर्शन; पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 16:00 IST2025-05-31T15:53:17+5:302025-05-31T16:00:47+5:30
Actress Urmila Matondkar : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने अलिकडेच आसाममधील कामाख्या मंदिराला भेट दिली. या मंदिरातील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने अलिकडेच आसाममधील कामाख्या मंदिराला भेट दिली. या मंदिरातील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने यावेळी पंजाबी ड्रेस परिधान केला. नो मेकअप लूकमध्ये ती दिसली.
तिच्या कपाळावर लाल टिळा लावलेला दिसला आणि फोटोत ती मंदिरात धार्मिक विधी करताना दिसली.
उर्मिलाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, कामाख्या मंदिर. मुसळधार पाऊस.. रस्ते बंद..शहर ठप्प…पण दर्शन तर घ्यायचे होते. जीवनातील बऱ्याच गोष्टींसोबत हे पण आईवर सोडून दिलं. आज बोलवणं आलं आणि दर्शनही मिळालं. #नोमेकअप #नोग्लॅमर बस.. भक्ती
गुवाहाटीतील नीलाचल टेकड्यांमध्ये असलेले कामाख्या मंदिर हे भारतातील सर्वात पवित्र शक्तीपीठांपैकी एक आहे.
उर्मिला मातोंडकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
उर्मिला मातोंडकरने हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि मराठी चित्रपटसृष्टीत काम केले आहे.
२०२२ मध्ये, उर्मिलाने सौरभ वर्मा दिग्दर्शित 'तिवारी' या वेब सिरीजद्वारे पुनरागमनाची घोषणा केली. ही कथा कल्की तिवारी या एका महिलेची आहे, जी चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकली गेली आहे, जी तिच्या सुटकेनंतर तिला फसवण्यासाठी जबाबदार असलेल्या पुरूषाचा शोध घेण्यास निघते.