प्रसिद्ध अभिनेत्रीने दसऱ्याच्या मुहुर्तावर केलं लेकीचं बारसं, खूपच खास आहे नाव; बघा सुंदर Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:13 IST2025-10-03T17:04:59+5:302025-10-03T17:13:55+5:30

गेल्याच महिन्यात अभिनेत्रीने एका गोड परीला जन्म दिला. अनोख्या पद्धतीने रिव्हील केलं नाव

'कभी खुशी कभी गम'सिनेमात छोट्या 'पू'च्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री मालविका राजने गेल्या महिन्यात गोंडस मुलीला जन्म दिला.

तिने ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली होती. तर आता काल दसऱ्याच्या मुहुर्तावर मालविकाने लेकीचं नामकरणही केलं आहे.

मालविका आणि पती प्रणव बग्गा यांनी आपल्या परीचं नाव काय ठेवलं वाचा.

मालविका राजने सोशल मीडियावर सुंदर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिने पतीसोबत खास आऊटफिट परिधान करत ट्विनींग केलं आहे.

फुलांची प्रिंट असलेल्या क्रीम रंगाच्या ड्रेसमध्ये मालविका सुंदर दिसत आहे. तर पतीनेही असाच कुर्ता आणि पायजमा घातला आहे.

एका फोटोत मालविकाने आपल्या एक महिन्याच्या लेकीलाही घेतलं आहे. तर आणखी एका फोटोत तिने लेकीच्या नावाचा खुलासा केला आहे.

मालविकाने लेकीच्या नावाचं पेंडंटच घातलं आहे. 'महारा' असं तिने मुलीचं नाव ठेवलं आहे.

मालविकाचे हे सुंदर फोटो पाहून चाहत्यांनी खूप लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

मालविका अभिनेत्री तसंच मॉडेल आहे. तिने बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००१ साली आलेल्या 'कभी खुशी कभी गम'ने तिला ओळख दिली. २०२१ मध्ये ती 'अॅक्शन स्क्वॉड' सिनेमात दिसली होती.