वन नाइट स्टँडनंतर अभिनेत्री झाली प्रेग्नेंट, मग केलं अबॉर्शन, केला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:42 IST2025-06-23T16:40:05+5:302025-06-23T16:42:51+5:30
ओटीटीवर काम करून लोकप्रियता मिळवलेल्या या अभिनेत्रीने अलीकडेच वन नाईट स्टँडबद्दल सांगितले आणि म्हणाली की, त्यानंतर ती प्रेग्नेंट झाली होती.

ओटीटीवर काम करून लोकप्रियता मिळवलेल्या या अभिनेत्रीने अलीकडेच वन नाईट स्टँडबद्दल सांगितले आणि म्हणाली की, त्यानंतर ती प्रेग्नेंट झाली होती.
ही सौंदर्यवती दुसरी तिसरी कोणी नसून कुब्रा सैत आहे. या अभिनेत्रीने अलीकडेच खुलासा केला की वन नाईट स्टँडनंतर तिने अबॉर्शन केले होते.
अभिनेत्रीने सांगितले की ती वयाच्या ३० व्या वर्षी अंदमानच्या सहलीला गेली होती, जिथे तिने स्कूबा डायव्हिंग केले.
तिथे अभिनेत्रीने काही ड्रिंक्स घेतले आणि तिच्या एका मित्रासोबत वन नाईट स्टँड केला.
काही दिवसांनी तिला समजले की ती प्रेग्नेंट आहे. कारण, प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली.
कुब्राने एका आठवड्यानंतर अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला. ती एक व्यक्ती म्हणून या निर्णयासाठी तयार नव्हती.
अभिनेत्री म्हणाली की त्यावेळी मला आतून खूप खाली खाली वाटत होते. अबॉर्शन न करता ती त्याच्यासोबत राहू शकेल की नाही याचा विचार ती करू शकत नव्हती.
अभिनेत्रीने याबद्दल कोणालाही सांगितले नाही आणि एकटी जाऊन अबॉर्शन केले. नंतर एका मैत्रिणीला याबद्दल सांगितल्यानंतर ती रडू लागली.