चेहऱ्याला लकवा मारला, स्मृती गेली...; भीषण अपघातानंतर 'आशिकी' फेम अभिनेत्रीची झाली वाईट अवस्था, आता ओळखणंही कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:35 IST2025-10-03T13:30:53+5:302025-10-03T13:35:30+5:30

'आशिकी'मध्ये राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. या सिनेमानंतर अनु अग्रवाल आशिकी गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.

९०च्या दशकातील सर्वात गाजलेला रोमँटिक सिनेमा म्हणजे 'आशिकी'. या सिनेमातील गाणी तर हिट झालीच पण मुख्य भूमिका साकारणाऱ्या हिरो आणि हिरोईनलाही सिनेमाने प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं.

'आशिकी'मध्ये राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. या सिनेमानंतर अनु अग्रवाल आशिकी गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.

पण, दुर्देव असं की सिनेमा हिट झाल्यानंतर काहीच वर्षांमध्ये अनु अग्रवालच्या गाडीचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती.

अपघातामुळे अनु अग्रवालचा चेहरा विद्रुप झाला होता. तिच्या शरीराच्या एका भागाला लकवा मारला होता.

२९ दिवस अनु अग्रवालची कोमामध्ये मृत्यूशी झुंज सुरू होती. कोमामधून बाहेर आल्यानंतर अनु अग्रवालला काहीच आठवत नव्हतं. तिची स्मृती गेली होती.

एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेल्या आशिकी गर्लचं आयुष्य एका रात्रीत पूर्ण बदललं होतं. त्यानंतर अनुने सिनेइंडस्ट्री सोडली.

अनु अग्रवाल तीन वर्ष सर्जरी आणि ट्रीटमेंट घेत होती. पण, यानंतरही तिचा चेहरा पूर्णपणे बदलला. आता तिला ओळखणंही कठीण जात आहे.

अपघातानंतर अनु अग्रवाल अध्यात्माकडे वळली. आता ती एक योग प्रशिक्षक आहे.

ती सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक इव्हेंटमध्येही सहभागी होताना दिसते. इन्स्टाग्रामवर तिचे १.९ मिलियन फॉलोवर्स आहेत.