4611_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 16:00 IST2016-03-31T23:00:03+5:302016-03-31T16:00:03+5:30

क्रि केटच्या दुनियेत भारताला सर्वोच्य स्थानी पोहोचवण्यात अनेक दिग्गज खेळाडूंचे योगदान आहे. मात्र यात समोर येतो तो सचिन तेंडूलकर. सचिनने अत्यंत कमी वयात क्रि केटमध्ये पदार्पण करून स्वत:च्या अक्र ामक खेळीने संपूर्ण जगाला वेड लावले. सचिन जेव्हा बॅटींगसाठी मैदानात असायचा तेव्हा दुसºया बाजूने खेळत असलेल्या संघाला घाम फुटायचा. बॉलर्सला प्रश्न पडत होता की, सचिनला कशा प्रकारचा बॉल टाकायचा. कारण कसलाही बॉल टाकला तरी सचिन तो बरोबर मैदानाबाहेर पाठवत असे. मात्र जेव्हा त्याने २०० व्या कसोटीनंतर निवृत्ती घेतली, तेव्हा सगळ्यानीच हा क्षण नजरेत कैद केला. जगभरासाठी हा क्षण ऐतिहासिक होता. अशा इंडियन क्रिकेटमधील ऐतिहासिक क्षणांचा घेतलेला हा आढावा...