एखाद्या स्वप्नाप्रमाणेच सुंदर आहे Sunny Leone चं आलिशान घर; पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 15:00 IST2021-12-26T14:47:29+5:302021-12-26T15:00:22+5:30
सनी लियोन अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओन अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असते. यावेळी ती आपलं नवीन गाणं मधुबनमुळे चर्चेत आहे. या गाण्याच्या माध्यमातून भावना दुखावल्या आरोप करण्यात आला आहे.
सनी लिओन सध्या अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमधून झळकत आहे. दरम्यान, तिच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल काहीच जणांना माहित आहे. तिचं घर हे स्वप्नातल्याच घराप्रमाणे सुंदर आणि भव्यही आहे.
बिग बॉस 5 पासून सनी लिओननं एन्टरटन्मेंट वर्ल्डमध्ये प्रवेश केला. यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर सनीनं मुंबईत घर खरेदी केलं आहे.
सनीच्या घरात एक स्विमिंग पूरलदेखील आहे. घरात असलेल्या बाल्कनीसारख्या मोकळ्या जागेत हा स्विमिंगपूल तयार करण्यात आलाय.
तिच्या घरात भितींवर काही चांगली पेन्टिंग्सही लावण्यात आली आहे. तिनं आपल्या घराला एक रिच आणि क्लासी लूक देण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
सनीनं घराला सिंपल आणि क्लासी लूक दिला असून ती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या घराचे फोटो शेअर करत असते.
सनी लिओनचं घर मुंबईतील अंधेरी पश्चिमेला असलेल्या अटलांटिस या बिल्डिंगमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार तिच्या घराची किंमत १६ कोटी रुपये आहे.
या फोटोमध्ये सनी लिओन आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतेय. यामध्ये संपूर्ण कुटुंब जमिनीवर बसून पिझ्झा पार्टी एन्जॉय करत आहे. सनीच्या घरातून मुंबईचाही सुंदर व्ह्यू दिसतो.
सर्व फोटो - सनी लिओन, इन्स्टाग्राम