एकेकाळची मिस इंडिया, सौंदर्याची आजही होते चर्चा! इंडस्ट्रीतून अचानक झाली गायब; देओल कुटुंबाशी खास नातं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:02 IST2025-10-15T16:46:14+5:302025-10-15T17:02:36+5:30
कुठे गायब झाली'मेरा लॉन्ग गवाचा'गर्ल;आता लाइमलाईटपासून राहते दूर

सौंदर्य आणि प्रतिभा असतानाही नशीबात यश नसल्याने, हिंदी चित्रपटसृष्टीत अयशस्वी ठरलेल्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे दिप्ती भटनागर.
सौंदर्यात माधुरी, रवीनाला टक्कर देणारी अभिनेत्री दिप्ती भटनागरने ९० चा काळ गाजवला होता. दीप्ती भटनागरचा जन्म ३० सप्टेंबर १९६७ ला उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झाला.
१९९० मध्ये मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर तिने अभिनय क्षेत्राकडे मोर्चा वळवला. यशस्वी मॉडेलिंगच्या क्षेत्रातून लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. १९९५ मध्ये आलेल्या रामशास्त्र या चित्रपटातून तिचे रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.
दिप्ती भटनागरने हिंदीसह तेलूगु, तमिळ भाषेतील चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 'हमसे बढकर कौन', 'दुल्हन बनू मैं तेरी', 'मन' या गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
दीप्ति भटनागरने टीव्ही शो 'यात्रा' होस्ट केला होता. त्या शोच्या माध्यमातून ती घराघरात जाऊन पोहोचली होती. देशभरातील मंदिरं आणि धार्मिक स्थळांची तिने माहिती दिली होती.
दिप्तीने दिग्दर्शक रणदीप आर्य यांच्याशी विवाह केला.त्यानंतर ती इंडस्ट्रीपासून दुरावली. या दाम्पत्याला शुभ आणि शिव ही दोन अपत्ये आहेत.
दीप्ती भटनागर देओल कुटुंबाचा भाग असल्याचं खूप कमी जणांना माहिती आहे.ती धर्मेंद्र यांची सून आहे. ती धर्मेंद्र यांची सून आहे. दिप्तीचा पती रणदीप धर्मेंद्र यांच्या चुलत भावाचा मुलगा आहे.