वयाच्या 55 व्या वर्षीही 'आशिक गर्ल' आहे प्रचंड बोल्ड; फोटो पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 18:30 IST2024-02-10T18:26:25+5:302024-02-10T18:30:29+5:30

Anu aggarwal: अनुने वयाची ५० शी पार केली आहे. परंतु, आजही ती प्रचंड ग्लॅमरस आणि फिटनेस फ्रीक असल्याचं लक्षात येतं.

'आशिकी गर्ल' म्हणून रातोरात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अनु अग्रवाल (anu aggarwal).

या सिनेमाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मात्र, एका अपघातामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं.

अनु आज कलाविश्वात सक्रीय नाही. मात्र, सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.

अनुने वयाची ५० शी पार केली आहे. परंतु, आजही ती प्रचंड ग्लॅमरस आणि फिटनेस फ्रीक असल्याचं लक्षात येतं.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली अनु बऱ्याचदा तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

अनुने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. मात्र, आता तिने इंडस्ट्रीपासून फारकत घेतली आहे. क्वचित एखाद्या कार्यक्रमात ती झळकते.

अनुचा कार अपघात झाल्यानंतर ती २९ दिवस कोमामध्ये होती. या अपघातानंतर तिचं करिअर संपल्यात जमा झालं. त्यामुळे ती पडद्यापासून दुरावली. सध्या ती एक मेंटल हेल्थ फाऊंडेशन चालवते.