या अभिनेत्यासोबत लीव्ह इन मध्ये राहात होती दिशा पटानी, पण या अभिनेत्यामुळे तुटले नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 17:47 IST2021-03-11T17:25:21+5:302021-03-11T17:47:03+5:30

कसौटी जिंदगी की 2 या मालिकेमुळे पार्थ समंथनला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
दिशा आणि पार्थ एकमेंकासोबत जवळजवळ वर्षभर रिलेशनशीपमध्ये होते.
पार्थला डेट करत असताना दिशा आज इतकी फेमस नव्हती. इंडस्ट्रीतही फारशी अॅक्टिव नव्हती.
पार्थ त्यावेळी चांगलाच प्रसिद्धीझोतात होता. दोघांची लव्हस्टोरी वर्षभर चालली.
पण एक व्यक्ती या लव्हस्टोरीतील ‘विलन’ ठरली. ही व्यक्ती कोण तर विकास गुप्ता. होय, टीव्ही निर्माता विकास गुप्ता याच्यामुळे दिशा व पार्थचे ब्रेकअप झाल्याचे मानले जाते.
2015 मध्ये पार्थ आणि विकास गुप्ता हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती.
यादरम्यान पार्थने विकासला लीगल नोटीस पाठवत, लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याच्याही बातम्या आल्या होता.
दोघांचे काही इंटीमेट फोटोही इंटरनेटवर व्हायरल झाले होते. पार्थ बायसेक्शुअल असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.
एकीकडे दिशासोबत रिलेशनशिपमध्ये असताना पार्थ विकाससोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत होता.
दिशासाठी हा मोठा धक्का होता. याचमुळे तिने पार्थसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला आणि हे नाते संपले.