बिपाशा बासूने चक्क शेअर केले नवऱ्यासोबतचे खाजगी फोटो, नेटकऱ्यांनी दिल्या भरभरून कमेंट्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 15:58 IST2021-01-04T15:58:10+5:302021-01-04T15:58:10+5:30

बिपाशा बासूने पती करण सिंग ग्रोव्हरसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये बिपाशा आणि करण रोमँटिक अंदाजात आपल्याला पाहायला मिळत आहेत.
बिपाशा आणि करणच्या या फोटोंवर त्यांचे चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.
बिपाशा आणि करणचा हा अंदाज प्रचंड भावला असल्याचे ते सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.
बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांची बॉलिवूडमधील हॉट कपलमध्ये गणना होते.
बिपाशा बासूचे हे पहिले लग्न असून करण सिंग गोव्हरचे हे तिसरे लग्न आहे. त्याने याआधी अभिनेत्री श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेट यांच्यासोबत लग्न केले होते.
बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती.
बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.