Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 23:24 IST2025-08-24T22:01:47+5:302025-08-24T23:24:35+5:30
अत्यंत गाजलेल्या आणि वादग्रस्त असूनही लोकप्रिय ठरलेल्या बिग बॉस हिंदीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बिग बॉस १९'चा ग्रँड प्रिमियर नुकताच पार पडला. पाहा स्पर्धकांची पूर्ण यादी.

अत्यंत गाजलेल्या आणि वादग्रस्त असूनही लोकप्रिय ठरलेल्या बिग बॉस हिंदीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बिग बॉस १९'चा ग्रँड प्रिमियर नुकताच पार पडला.
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री अश्नूर कौर हिने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.
'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेता झीशान कादरी आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर तानिया मित्तल यंदाच्या बिग बॉस १९चे स्पर्धक आहेत.
'मिस युनिव्हर्स दिवा'सारख्या अनेक ब्युटी स्पर्धांमध्ये भारताचं नेतृत्व केलेली नेहाल चुडासिमा बिग बॉसमध्ये आली आहे.
बसीर अली, अभिषेक बजाज यांच्यासोबत रील कपल असलेल्या अवेझ दरबार आणि नगमा मिराजकर यांनीही बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली आहे.
हिंदी टेलिव्हिजनचा लाडका लेक आणि ग्रीन फ्लॅग असलेल्या अभिनेता गौरव खन्नाने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली.
प्रणित मोरेची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. बिग बॉसच्या घरात प्रणितला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
'बिग बॉस १९'च्या प्रोमोमध्ये अमालची झलक दिसली होती. या प्रोमोवरुन चाहत्यांनी अमाल मलिक असल्याचं ओळखलं होतं. प्रेक्षकांचा हा अंदाज खरा ठरला आहे. सिंगर अमाल मलिकने बिग बॉसमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कुनिका सदानंद देखील बिग बॉसच्या घरची सदस्य आहे.
अभिनेत्री फरहाना भट आणि निलम गिरीही यंदाच्या बिग बॉस १९च्या स्पर्धक आहेत.
बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलेल्या नतालियानेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.
चाहत्यांनी केलेल्या व्होटिंगमुळे मृदुल तिवारी बिग बॉसच्या घरात पोहोचला आहे.