'भाग्य दिले तू मला' फेम तन्वी मुंडलेच्या समुद्रकिनारी ग्लॅमरस अदा, फोटोंना मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 12:20 IST2024-05-11T12:07:24+5:302024-05-11T12:20:44+5:30
Tanvi Mundale : तन्वी मुंडलेचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री तन्वी मुंडले मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. भाग्य दिले तू मला मालिकेतून ती घराघरात पोहचली आहे.
भाग्य दिले तू मला मालिकेनं नुकतेच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र प्रेक्षकांच्या मनातील राज कावेरीचं स्थान कायम आहे. तन्वीने या मालिकेत कावेरीची भूमिका साकारली होती.
तन्वी मालिकेत काम करताना दिसत नसली तरी ती सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट देत आहे. सध्या ती व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.
नुकतेच तन्वीने सोशल मीडियावर समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत तन्वी खूपच ग्लॅमरस दिसते आहे. यात तिने व्हाईट रंगाचा शॉर्ट वन पीस परिधान केला आहे.
तन्वी मुंडलेच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
उत्तम अभिनयकौशल्य आणि सोज्वळपणा यांच्या जोरावर तन्वीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे.