सुंदरा..! निळी साडी, केसात गजरा अन् कानात झुमका, जान्हवी कपूरचा देसी लूक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 13:42 IST2022-11-03T13:37:32+5:302022-11-03T13:42:05+5:30

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने नुकतेच निळ्या रंगाच्या बनारसी साडीत फोटोशूट केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

जान्हवी कपूरने नुकतेच निळ्या रंगाच्या बनारसी साडीत फोटोशूट केले आहे.

या फोटोत जान्हवी कपूर निळ्या रंगाच्या साडी, केसात गजरा, कानात झुमके आणि कपाळावर टिकली असा साज श्रृंगार केला आहे.

बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करणारी जान्हवी कपूरचा देसी लूकदेखील चाहत्यांना भावतो आहे.

जान्हवी कपूरचा देसी लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

जान्हवी कपूरचा ट्रेडिशनल लूक पाहून चाहत्यांना तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची आठवण येते आहे.

जान्हवीच्या फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिले - 'तीच्या आईसारखी दिसत आहे'. याशिवाय आणखी एका युजरने कमेंट केली - 'ही श्रीदेवीची कॉपी आहे'.

जान्हवी कपूर लवकरच मिली या चित्रपटात झळकणार आहे.

जान्हवी कपूर आणि सनी कौशलचा 'मिली' हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

शेवटची जान्हवी कपूर गुडलक जेरी चित्रपटात झळकली होती.