UPSC ची परीक्षा देताय? मोटिव्हेशन मिळवण्यासाठी ५ भागांची 'ही' वेबसीरिज बघाच, IMDB वर ९.१ रेटिंग
By देवेंद्र जाधव | Updated: March 16, 2026 16:02 IST2026-03-16T15:52:02+5:302026-03-16T16:02:00+5:30
अनेक लोक करिअरमध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. upsc ही या स्पर्धा परीक्षांमधली प्रमुख परीक्षा. upsc क्रॅक केली की प्रशासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळते आणि आयुष्य जणून मार्गी लागतं. यावर आधारीत एक वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. तिचं नाव आहे...

अनेक लोक करिअरमध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. upsc ही या स्पर्धा परीक्षांमधली प्रमुख परीक्षा. upsc क्रॅक केली की प्रशासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळते आणि आयुष्य जणून मार्गी लागतं. यावर आधारीत एक वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. तिचं नाव आहे 'ॲस्पिरंट्स ३'.

२०२१ ला 'ॲस्पिरंट्स' वेबसीरिजचा पहिला सीझन आला होता. त्यानंतर आता ५ वर्षांनी या वेबसीरिजचा तिसरा सीझन आला आहे. आधीच्या दोन्ही सीझनप्रमाणे याही सीझनला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय.

जगप्रसिद्ध मूव्ही रेटिंग वेबसाईट IMDB वर 'ॲस्पिरंट्स'ला तब्बल ९.१ रेटिंग आहे. इतर भारतीय वेबसीरिजच्या तुलनेत हे रेटिंग जबरदस्त आहे.

upsc किंवा mpsc तयारी करताना अनेकदा नैराश्य येते. कधीकधी अभ्यासाचा कंटाळा येतो. त्या सर्व लोकांसाठी 'ॲस्पिरंट्स ३' ही वेबसीरिज नक्कीच एक प्रेरणादायी आहे.

IAS/IPS अधिकारी झाल्यावर अधिकाऱ्यांच्या समोर असणारी आव्हानं आणि स्वतःच्याच लोकांसोबत असलेला वैचारीक संघर्ष 'ॲस्पिरंट्स ३'मधून पाहायला मिळतो.

एकूण पाच भागांची ही वेबसीरिज आपल्याला प्रेरणा आणि स्फूर्ती देतेच शिवाय upsc ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं वास्तव समोर आणतेय. त्यामुळे ज्यांना ही परीक्षा द्यायची असेल त्यांच्यासाठी 'ॲस्पिरंट्स ३' नक्कीच एक चांगला पर्याय आहे.

अमेझॉन प्राईम व्हिडीओवर तुम्हाला 'ॲस्पिरंट्स ३' पाहता येईल. नवीन कस्तुरिया, शिवांकित परिहार, नमिता दुबे, अभिलाष थपलियल,सनी हिंदुजा या कलाकारांची 'ॲस्पिरंट्स ३'मध्ये प्रमुख भूमिका आहे. दीपक सुमित्रा जगदीश यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे

















