केरळमध्ये गरोदर हत्तीला दिला होता फटाक्याने भरलेला अननस, यामुळे झाले तिचे निधन, सेलिब्रेटींनीही व्यक्त केला रोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 19:15 IST2020-06-03T19:15:17+5:302020-06-03T19:15:17+5:30

अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. त्यामुळे भुकेल्या हत्तीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला.
ही हत्ती गरोदर होती. हे अननस खाल्ल्याने तिचे आणि तिच्या पोटातील बाळाचे निधन झाले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यानेच सोशल मीडियाद्वारे या घटनेविषयी सगळ्यांना सांगितले.
ही घटना अतिशय निंदनीय असून लोक सोशल मीडियाद्वारे या घटनेच्याविरोधात आपली मतं नोंदवत आहेत.
रणदीपने ट्वीट करत ही घटना अमानवीय असल्याचे म्हटले आहे.
अनुष्का शर्मा, दीपिका चिखलिया यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी असे कृत्य करणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे असे सोशल मीडियाद्वारे मत व्यक्त केले आहे.