लग्नातही डिट्टो ऐश्वर्या राय सारखी दिसली अभिनेत्री मानसी नाईक, पाहा तिचे नवीन फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 17:03 IST2021-01-19T16:57:16+5:302021-01-19T17:03:02+5:30
आरस्पानी सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी ऐशवर्या राय बच्चन प्रसिद्ध आहे. मानसी नाईकही मराठी चित्रपटसृष्टीची ऐश्वर्या राय म्हणूनही ओळखले जाते.ऐश्वर्या सारखेच साम्य तिच्या चेह-यात आहे.

लग्नावेळी मानसी कोणता लूक करणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक होते.
लग्नावेळी तिला पाहताच सा-यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.
कारण पुन्हा एकदा सेम टू सेम ऐश्वर्या प्रमाणे नटून ती लग्नमंडपात उभी होती.
लग्नमंडपात हुबेहुब ऐश्वर्यासारखी मानसी दिसत होती.
एरव्हीही तिची स्टाइलही ती ऐश्वर्यासारखीच ठेवण्याचा प्रयत्न करते.
लग्नातही तिने ऐश्वर्यालाच फॉलो केल्याचे पाहायला मिळाले.
नववधूच्या रुपात नटलेली मानसी ऐश्वर्यासारखीच मेकअप करत भाव खावून गेली.
गुलाबी रंगाच्या लेहंग्यात तिच्या सौंदर्याला चारचाँद लागले आहेत.
ऐश्वर्याप्रमाणेच मानसीला नटली पाहून तुम्हालाही 'जोधा अकबर' सिनेमातली ऐश्वर्या आठवेल.
मानसीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
मानसी ही उत्तम डान्सर आहे त्यामुळे लग्नातही तिने ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.
तिच्याच लग्नात तिच्या डान्सचे जलवेही पाहायला मिळाले.