भारतात नाही तर 'या' देशात झाला आहे अभिनेत्री दीपिका पादुकोणचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 19:55 IST2024-01-07T19:36:30+5:302024-01-07T19:55:45+5:30
दीपिकाचा जन्म भारतात झालेला नाही.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
प्रेक्षकांना भूरळ पाडणारे सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर ती सिनेसृष्टीत वेगळ्या उंचीवर पोहोचली.
'ओम शांत ओम'मधूनसिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या दीपिकाने आजवर अनेक हिट सिनेमे केले आहेत.
दीपिकानं आतापर्यंत अनेक महिला सशक्तिकरण, रोमँटिक, अँक्शन फिल्म्स अशा वेगळवेगळ्या सिनेमात काम केलं आहे.
दीपिका सध्या नवरा रणबीर सिंगबरोबर मुंबईमध्ये राहतेय.
दीपिका बँटमिंटन प्लेअर देखील होती. अभिनयात नशीब आजमावण्यापूर्वी दीपिकाला बॅडमिंटन खेळण्यात रस होता.
ती प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे.
पण दीपिकाचा जन्म हा भारतात झालेला नाही. दीपिका विदेशात जन्माला आली आहे.
दीपिकाचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथे झाला.
दीपिकाचे वडिल प्रकाश पादुकोण हे एका प्रशिक्षणासाठी तिथे वास्तव्यास होते. दीपिका 1 वर्षांची असताना तिचे कुटुंब डेन्मार्कमधून भारतात स्थलांतरित झाले.
दीपिका ही बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री मानली जाते. लवकरच ती 'फायटर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.