'देवमाणूस' मालिकेतील एसीपी दिव्या सिंग खऱ्या आयुष्यात आहे भलतीच ग्लॅमरस, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:11 IST2025-04-02T16:00:32+5:302025-04-02T16:11:03+5:30

Neha Khan : 'देवमाणूस' फेम अभिनेत्री नेहा खानने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

नेहा खानने स्वतःच्या हिमतीवर मराठी कलाविश्वात आपले स्थान निर्माण केले आहे.

नेहा खानने मराठी सिनेमा, मालिका आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

खरेतर नेहा खानने साउथ सिनेइंडस्ट्रीतून सिने करिअरची सुरुवात केली आहे. तिने शिकारी सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केले.

नेहा खानने शिकारी सिनेमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर ती काळे धंदे या सीरिजमध्येही पाहायला मिळाली.

नेहा खानने झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' मालिकेत काम केले. यात तिने एसीपी दिव्या सिंगची भूमिका साकारली होती.

शेवटची नेहा खान बाई गं सिनेमात पाहायला मिळाली. यात तिच्यासोबत प्रार्थना बेहरे आणि स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत होते.

नेहा खान खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. ती सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

नुकतेच नेहा खान हिने व्हाईट रंगाचा वन पीस परिधान केला आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

नेहा खानच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

नेहा खानचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.